Saturday, September 06, 2025 01:26:17 PM

Live Updates Ganesh Visarjan Miravnuk 2025 : चैन पडेना आम्हाला...! गुलालाची उधळण... फुलांचा वर्षाव... थाटात निघाला लालबागचा राजा

गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत.

live updates ganesh visarjan miravnuk 2025  चैन पडेना आम्हाला गुलालाची उधळण फुलांचा वर्षाव थाटात निघाला लालबागचा राजा

गेल्या दहा दिवसांपासून घरगुती, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज, अकराव्या दिवशी भाविका आपल्या बाप्पाला निरोप देणार आहेत. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणरायाचा उत्सव साजरा केल्यानंतर आधी दीड दिवसांचा, नंतर पाच दिवसांचा, पुढे सात दिवसांचा आणि आज अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.


12.55 pm 

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत साडेतीन शक्तिपीठाचा देखावा 

12.38 pm

ही शान कोणाची.....; लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

12.02 pm

लालबागचा राजा विसर्जनसाठी मंडपातून निघाला

11.50 am

महाराष्ट्रातील नागपूरमध्ये नागपूरचा राजाच्या विसर्जनासाठी 'विसर्जन मिरवणूक' सुरू.

11.40 am

नाशिकमध्ये घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात. तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीलाही सुरुवात. मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या महापालिकेच्या गणपतीची आरती संपन्न.
 

11.20 am

लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना घडली असून लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन वर्षांची चंद्रा वजणदार हिचा मृत्यू झाला असून तिचा भाऊ 11 वर्षीय शैलू वजणदार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

10.40 am

नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) भव्यतेने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. शहरातील जलाशयांमध्ये विसर्जनास मनाई असल्याने, एनएमसीने एकूण 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलाव उभारले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी विपिन इटनकर आणि महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी विविध विसर्जन स्थळांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

10.18 am

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन सुरू झाले आहे.

10.00 am

लालबागचा राजाच्या आरतीला सुरूवात. थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार. 

9.53 am

निवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज शहरातील मंडळ 10 दिवसाच्या गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो तर पालघरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

9.10 am

पुण्यातील मानाच्या गणपती मिरवणुकीला सुरूवात झाली असून कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हे पुण्यातील पाच मानाचे गणपती विसर्जनस्थळी मार्गस्थ झाले आहे.

8.44 am

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी अनंत चतुर्थीची पत्नीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा केली. 

8.16 am

मुंबई पोलिसांनी यंदाच्या विसर्जनासाठी तब्बल 21 हजार कर्मचारी तैनात केले आहेत. यात सहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती आणि दीड लाख घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे.

8.04 am

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या गणरायाची आरती सुरू. थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरूवात

7.53 am

मुंबईसह, कोकणात आणि राज्यातही गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. घरगुती गणरायासह सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा भाविकांना पाहायला मिळणार आहे.


सम्बन्धित सामग्री