दिपक चव्हाण. प्रतिनिधी. सांगली: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, तब्बल 183 वर्षाची परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज उत्साहात साजरी करण्यात आली. यादरम्यान, मुख्य गणेश मंदिरापासून पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि शाही लवाजाम्यांसह गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा: Uddhav and Raj Thackeray Meet: उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब राज यांच्या बाप्पाचं दर्शन, राज आणि उद्धव यांच्यात 10 मिनिटे चर्चा, नेमकं काय घडलं?
सांगली गणपती संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि युवराज कुमार आदित्य राजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही गणपतीची आरती करण्यात आली. यादरम्यान, मुख्य गणेश मंदिरापासून शाही लवाजाम्यांसह पारंपारिक वाद्यांच्या गजरात शाही गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. शाही गणपतीची मिरवणूक दरबार हॉल येथे आल्यानंतर युवराज आदित्य राजे पटवर्धन यांनी गणरायाचे दर्शन घेत त्यांचे स्वागत केले. यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गेल्या 183 वर्षांपासून पटवर्धन घराण्याकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा आहे. या निमित्ताने, पुढील पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
हेही वाचा: Ganeshotsav 2025 : घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम! गणेशोत्सवासाठी गोविंदा अन् सुनीता एकत्र
यावेळी, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे अध्यक्ष नितीन चौगुले, शिवसेना नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, अरुंधती अभ्यंकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते. 'सांगलीतील शाही गणपती उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे', अशी माहिती व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी दिली. यासह, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी यांनीही समस्त सांगलीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.