Uddhav Thackeray On India-Pakistan Match: दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'नीरज चोप्राने पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमला भारतात खेळण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावरून काही अंधभक्तांनी त्याला देशद्रोही म्हणण्याची लाजिरवाणी हिंमत दाखवली होती. आता तेच लोक भारत-पाक क्रिकेट सामन्याबाबत शांत आहेत. हा विरोधाभास नाही का?'
हेही वाचा - MNS Prakash Mahajan resign : 'माझ्या वाट्याला उपेक्षा...' प्रकाश महाजन यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे यांनी पुढे टीका करताना सांगितले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणे म्हणजे देशभक्तीची थट्टा आहे. देशभक्तीवर व्यापाराचे वर्चस्व आले आहे. भाजप नेत्यांनी स्पष्ट सांगावे की पाकिस्तानबद्दल त्यांची नेमकी भूमिका काय आहे. युद्ध थांबले आहे का? आणि जे नीरज चोप्राला देशद्रोही म्हणत होते, त्यांच्याबाबत आता काय करणार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा - PM Narendra Modi Birthday Gift : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदेंचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची आठवण करून देताना सांगितले की, बाळासाहेबांनी त्याला स्पष्ट सुनावले होते, जोपर्यंत पाकिस्तान भारताशी नीट वागत नाही, तोपर्यंत क्रिकेटसह कोणत्याही प्रकारचे संबंध स्वीकारले जाणार नाहीत.