Wednesday, September 03, 2025 02:37:29 PM

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. यातच आता पालघरमधून मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.

मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

पालघर: गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. यातच आता पालघरमधून मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पालघरमध्ये राज ठाकरे यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या बँनरवरील फोटोला काळं फासण्यात आलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढी पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे पक्षातील अंतर्गत धुसफूस बाहेर पडली आहे.

हेही वाचा: निलम गोऱ्हेंचं वक्तव्य चर्चेत

याबाबत अधिक माहित अशी की, मनसैनिकांना गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील मनसे नेते अविनाश जाधव यांच्या फोटोला काळं फासण्यात आले आहे. पालघरच्या बोईसर मधील ओसवाल परिसरात लागलेल्या बॅनरवरील फोटोला काळं फासण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

अविनाश जाधव यांच्या फोटोला पालघरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी काळ फासल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेते अविनाश जाधव आणि पालघर मधील मनसैनिकांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. अविनाश जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वी स्थानिक मनसैनिकांनी आक्षेप घेतले होते. मात्र, स्थानिक मनसैनिकांमध्ये जाधवांबद्दल असलेला रोष अद्याप कमी झाला नसल्याची चर्चा रंगली आहे.


सम्बन्धित सामग्री