मुंबई : आमदार धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा खडेबोल सुनावले आहेत. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन पाच-सहा उलटले असतानाही त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडलेला नाही. यावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी तुम्ही बंगला सोडा आणि माझ्या फ्लॅटमध्ये येऊन रहा, अशी ऑफर दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांचे मुंबईत मलबार हिल्स, पवई आणि आपण राहत असलेला सांताक्रूझ येथील फ्लॅट असे मिळून तीन घरं आहेत. त्यांचे दोन फ्लॅट भाड्याने दिलेले असले तरी ते त्यांच्या पत्नीसोबत सांताक्रूझ येथील घरात येऊन राहू शकतात. आपण हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ, असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी शासकीय बंगला सोडावा, असेही करुणा यांनी सुचवले आहे. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद केले असून ते त्यांना पुन्हा मिळेल, या आशेने ते बंगला सोडत नसतील, तर तस काहीही होणार नाही. त्यांना मंत्रिपदच काय, तर त्यांची आमदारहीही लवकर जाणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Sanjay Gaikwad : 'उद्धव ठाकरेंच्या बापालाही...'; संजय गायकवाडांचा 'त्या' विधानावरुन यू-टर्न