उरण, पनवेल: मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. यादरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. यासह, हवामान विभागाने पुढील काही दिवसात जोरदार पाऊस होणार असल्याची शक्तया वर्तवली आहे. मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने मुंबईतील जनजीवन विस्खळीत झाले आहे. अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये एक बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बोट गुजरातमधील मासोमारी करणारी बोट असल्याचे सांगितले जात आहे. या बोट अपघाताचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. सध्या, या बोटीचा शोध सुरू आहे. समुद्राचे पाणी शिरल्याने ही बोट बुडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.