कोल्हापूर: आताची सर्वात मोठी बातमी समोर आलीय. कोल्हापुरातून ही बातमी समोर आली असून या बातमीने एकच खळबळ उडालीय. प्रशांत कोरटकरवर हल्ला झाल्याचं समोर आलंय. प्रशान्त कोरटकरवर वकिलांनी हल्ला केल्याचं बोललं जातंय. वकिलांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतलं असून सर्वत्र एकच खळबळ उडालीय.
हेही वाचा: शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? अजित पवार स्पष्टच बोलले..
काय आहे प्रकरण:
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली. तसेच इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यामुळे कोरटकर अडचणीत आला आहे. सोमवारी त्याला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कोल्हापूर पोलीस स्थानकात आणण्यात आले असून आज इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणावर न्यायालयात सुनावणी झाली.
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे. दरम्यान प्रशांत कोरटकरवर हल्ला झाल्याचं समोर आलं असून. प्रशांत कोरटकरवर वकिलांनी हल्ला केल्याचं बोललं जातंय. वकिलांनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी वकिलांना ताब्यात घेतलं असून सर्वत्र एकच खळबळ उडालीय.