छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात तापमान दिवसेंदिवस तापमानाची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्याची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचले. जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा उद्योग व्यापारावर परिणाम होत आहे.
छत्रपती संभाजीनगरात एप्रिलमध्येच तापमानाचा पार चढला आहे. गुरुवारी पहाटे 28 अंशांवर असलेले तापमान 11.30 वाजता 39 अंशांवर जाऊन पोहोचते. उन्हाच्या काहिलीने अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या तापमानाचा म्हणजेच उन्हाचा उन्हाचा उद्योग-व्यापारावर विपरीत परिणाम होत आहे.
हेही वाचा : 232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; काश्मिरातून आतापर्यंत 800 पर्यटक परतले
यंदा सूयाने एप्रिलमध्येच रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. कारण शुक्रवारी (25 एप्रिल) रोजी यंदाच्या हंगामात कमाल तापमान चौथ्यांदा 42.4 अंशांवर जाण्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. पहाटे 5.30 वाजता कमाल तापमान 28 अंश होते. सकाळी 8.30 वाजता ते 32.8अंश आणि 11.30 वाजेपर्यंत 11 अंशांनी वाढून 39 अंशांवर पोहोचले होते. अडीच वाजता 41.2 आणि 3 ते 4 वाजेदरम्यान 42.4 अंश उच्चांकी पातळीवर तापमानाने उसळी घेतली होती. तीव्र उन्हाच्या झळांनी अंग भाजून निघत असल्याने पर्यटक, प्रवासी, शेतकरी, कामगार, व्यावसायिक आदी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे. दीड दशकानंतर यंदा प्रथमच एप्रिलच्या मध्यात पारा 42 अंशांवर जाण्याची नोंद झाली आहे.