Wednesday, August 20, 2025 09:26:55 AM

मंत्री धनंजय मुंडेंना दुर्मिळ Bell’s Palsy आजाराचे निदान – सलग दोन मिनिटही बोलता येत नाही!

महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना Bell’s Palsy या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले असून, त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर होत आहे.

मंत्री धनंजय मुंडेंना दुर्मिळ bell’s palsy आजाराचे निदान – सलग दोन मिनिटही बोलता येत नाही

महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना Bell’s Palsy या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले असून, त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर होत आहे. “या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही,” अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आजाराचे निदान
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडली. डॉक्टरांनी त्यांना प्रखर प्रकाश, धूळ आणि उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याच दरम्यान, त्यांना Bell’s Palsy या आजाराचे निदान झाले. सध्या त्यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Rekha Gupta New CM of New Delhi : रेखा गुप्ता मुख्यमंत्री बनल्यामुळे केजरीवालांना काय नुकसान होणार? काय आहे भाजपची खेळी?

मुंडेंना कार्यक्रमांना उपस्थित राहता आले नाही
या आजारामुळे धनंजय मुंडे काही महत्वाच्या कॅबिनेट बैठकींना आणि पक्षाच्या कार्यक्रमांना हजर राहू शकले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत माहिती दिली आहे.“लवकरच मी या आजारावर मात करून पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होईन,” असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Bell’s Palsy म्हणजे काय?
Bell’s Palsy हा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम करणारा न्यूरोलॉजिकल विकार आहे. या आजारामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला अर्धांगवायूचा (Paralysis) परिणाम होतो, चेहऱ्यावर सुन्नपणा जाणवतो आणि बोलण्यास अडथळा येतो.

'>http://


 


सम्बन्धित सामग्री






Live TV