Wednesday, August 20, 2025 05:22:34 PM

Nana Patole: नाना पटोलेंचं दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबन

नाना पटोले जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलले. त्यामुळे नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.

nana patole नाना पटोलेंचं दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबन

मुंबई: विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरु झालं असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले सभागृहात आक्रमक पाहायला मिळाले. पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर धावून गेले. या सदनातले सन्मानीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषीमंत्री सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही. हे अजिबात चालणार नाही, कारवाई झाली पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटले आहे. या प्रकारनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला. तुमच्याकडून असंसदीय भाषेचा उपयोग होणं योग्य नाही असे नार्वेकर म्हणाले.  नाना पटोले जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलले. त्यामुळे नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले. 

नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले. पटोलेंच्या निलंबनाविरोधात विरोधकांनी सभात्याग केला आहे. पटोले विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले. नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. यावर फडणवीसांनीच शेतकऱ्यांची माफी मागावी असे पटोलेंनी म्हटले आहे. पटोले यांनी कोकाटे आणि लोणीकरांच्या वक्तव्यावरुन चर्चा सुरू असताना गदारोळ सुरु केला. सत्ताधाऱ्यांकडून आमचा आवाज दाबला जात असल्याचे म्हणत माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा: शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेले आहेत. विरोधकांनी पूर्ण दिवस कामकाजवर बहिष्कार घातला त्या संदर्भात चर्चा करणार आहेत. नाना पटोले यांनी राज दंडाला हात लावला कारवाई संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. बबनराव लोणीकर यांनी जे शब्द वापरले ते भयानक आहेत. आम्ही स्थगन प्रस्ताव मांडताना त्यांच्या वतीने किंवा त्यांनी माफी मागितली असती तर विषया संपला असता. बबनराव लोणीकर यांचे सहमत आहे असे दिसत असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पुढे बोलताना, सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे की विधानभवनात निलंबित होणे. पहिल्यांदा शेतकऱ्यांचा आवाज उठवल्याने कोणीतरी निलंबित झाले आहे. हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने बसले आहे, शेतकऱ्यांच्या नाही. नाना पटोले यांचे निलंबन दुर्दैवी आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही बहिष्कार टाकला आहे असं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री