Thursday, September 04, 2025 04:59:05 AM

BMW पार्क केली, ड्रायव्हरला व्हिडिओ शूट करायला लावलं अन्… पुण्यातील ‘त्या’ ड्रामाचा शेवट कुठे ?

गौरव आहुजाने ड्रायव्हरला जबरदस्ती व्हिडिओ शूट करण्यास सांगितले. व्हिडिओत तो पोलिस आणि जनतेची माफी मागताना दिसतो. “माझ्याकडून चूक झाली, कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका. मी आठ तासांत सरेंडर करेन'

bmw पार्क केली ड्रायव्हरला व्हिडिओ शूट करायला लावलं अन्… पुण्यातील ‘त्या’ ड्रामाचा शेवट कुठे

पुणे: शहरात पुन्हा एकदा एका तरुणाच्या बेजबाबदार वर्तनाने गदारोळ माजवला आहे. बीएमडब्ल्यू कारमधून रस्त्यावर अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाने पोलिस आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, अटक टाळण्यासाठी त्याने केलेली खेळी आणि शेवटी पोलिसांच्या जाळ्यात सापडण्यापर्यंतचा प्रवास थरारक ठरला.

व्हिडिओ व्हायरल होताच गौरव आहुजा पुण्यातून थेट कोल्हापुरात पोहोचला. मात्र, तिथेही त्याने विचित्र डाव खेळला. कोल्हापूरच्या 20 किमी अलीकडे बीएमडब्ल्यू पार्क करून त्याने एका रिक्षाचालकाला धारवाडला जाण्यासाठी कार भाड्याने हवी असल्याचे सांगितले. मात्र, वाटेतच त्याने गाडी पुण्याच्या दिशेने वळवली आणि येरवड्यात परतला. त्याच्या या हालचालींमुळे प्रकरण आणखी गडद झाले.

गौरव आहुजाने ड्रायव्हरला जबरदस्ती व्हिडिओ शूट करण्यास सांगितले. व्हिडिओत तो पोलिस आणि जनतेची माफी मागताना दिसतो. “माझ्याकडून चूक झाली, कृपया माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका. मी आठ तासांत सरेंडर करेन” असे त्याने भावनिक साद घातली. मात्र, या नाट्याला अखेर पुन्हा एक ट्विस्ट मिळाला.

गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश अग्रवाल यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय चाचणीत भाग्येशच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण सापडले, तर गौरवचा अहवाल येणे बाकी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भाग्येश अटकेत असताना त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात बर्गर आणि कोल्ड कॉफी पाठवली. मात्र, माध्यमांच्या उपस्थितीमुळे पोलिसांनी ही ऑर्डर स्वीकारली नाही आणि त्या मित्रांना हाकलून लावले.

‘पोर्शे प्रकरण’नंतर पुण्यात पुन्हा संताप!
पोर्शे अपघातानंतर शहरात आधीच जनक्षोभ निर्माण झाला असताना, या नव्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “अशा माजोरड्या वर्तनावर त्वरित कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी होत आहे. सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त आणि अमर्याद वागणूक यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री