Viral Video: काही लोकांना विचित्र छंद असतात. ते विचित्र छंद कधीकधी महाग पडतात आणि ते पूर्ण करताना कधीकधी त्यांचा जीवही धोक्यात येतो. अलिकडेच एका चिनी महिलेसोबत अशीच एक घटना घडली. जेवताना नवीन अनुभव घेण्यासाठी चिनी महिला जिवंत झिंगा (कोळंबी) मासा खाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी माशाने महिलेवर हल्ला केला, ज्यामुळे ती महिला ओरडू लागली.
एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेच्या टेबलावर अनेक रंगीबेरंगी पदार्थ दिसत आहेत. त्यानंतर ती एक जिवंत कोळंबी पकडते आणि एका भांड्यात ठेवण्याचा प्रयत्न करते. या भांड्यात आधीच काही खेकडे आणि मासे होते. महिलेने अनेक वेळा प्रयत्न केला पण कोळंबी भांड्यातून निसटली. मग अचानक ती महिलेच्या हातावर हल्ला करते.
हेही वाचा: Man Attacked by Stray Dogs in Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये 7 भटक्या कुत्र्यांचा तरुणावर हल्ला; घटना CCTV मध्ये कैद
पुढे, ती महिला कोळंबी काढण्याचा प्रयत्न करते पण कोळंबी तिच्या हातावरुन हलत नाही. त्या महिलेला प्रचंड वेदना होऊ लागतात. रेस्टॉरंटचे कर्मचारी तिच्या मदतीसाठी पुढे येतात. लोक हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. वापरकर्ते वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडिओवर करत आहेत. काही लोक मासे शिजवून खाण्याचा सल्ला देत आहेत, तर काही लोक महिलेला एका जीवाला वेदना दिल्याबद्दल शिक्षा झाली आहे असं म्हणत आहेत.