Thursday, August 21, 2025 03:33:20 AM

पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यासाठी सध्या ब्रेक; पोलीस आयुक्तांनी नाकारले 400 अर्ज

पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यांसाठी सध्या ब्रेक लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 400 अर्ज नाकारले आहेत. तर 140 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत.

पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यासाठी सध्या ब्रेक पोलीस आयुक्तांनी नाकारले 400 अर्ज

पुणे: पुण्यात नवीन पिस्तूल परवान्यांसाठी सध्या ब्रेक लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 400 अर्ज नाकारले आहेत. तर 140 पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. 

नव्यांना परवाना देणं पोलीस आयुक्तांनी पूर्णपणे थांबवलं आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर पुण्यातील पोलिसांनी सक्त कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पिस्तूल परवाना देणे सध्या थांबवण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी 400 नागरिकांचे अर्ज थांबवले आहेत. 
 हेही वाचा : मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 'समृद्धी'च्या आमणे-इगतपुरी टप्प्याचं लोकार्पण

आरोपी शशांक हगवणे, निलेश चव्हाण आणि सुशील हगवणे यांना पुणे पोलीस आयुक्तालयातून परवाना मिळाला होता. 2022 मध्ये हा पिस्तूल परवाना मिळाला होता. संबंधित लोकांनी पोलिसांची दिशाभूल करून परवाना मिळवल्याचे समोर आले आहे. 2020 ते 2023 या काळात मोठ्या प्रमाणात पिस्तूल परवाने दिले गेले. गेल्या दीड वर्षात 19 परवाने दिले. त्यातील 10 परवाने वारसा हक्काने तर नऊ जणांना खेळाडू कोट्यातून परवाना दिला आहे. आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नवीन परवाने देणं बंद केलं आहे. 

पिस्तूल परवाने अनेक कारणांसाठी दिले जातात, त्यापैकी काही प्रमुख कारणे आपण जाणून घेऊयात 

स्व-संरक्षण- जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या जीविताला धोका वाटत असेल, तर ती व्यक्ती स्व-संरक्षणासाठी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज करू शकते. 

सुरक्षा व्यवस्था- सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो, जेणेकरून ते आपल्या कामात प्रभावीपणे मदत करू शकतील. 

वन्य प्राण्यांपासून संरक्षण- काही व्यक्तींना वन्य प्राण्यांपासून संरक्षण आवश्यक असते, अशा परिस्थितीत त्यांना शस्त्र परवाने दिले जातात. 

शेती पीकरक्षण- शेती पीक आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी शस्त्र परवाना दिला जाऊ शकतो. 

दरम्यान परवानाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांनाही परवाना सहज मिळू शकत नाही. त्यांनाही सर्व प्रक्रिया पार करूनच परवाना दिला जातो.


सम्बन्धित सामग्री