Sunday, August 31, 2025 05:47:25 PM

जीवाची पर्वा न करता खराडी पोलिसांनी दिले इसमाला जीवनदान

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक घटना घडली. बुधवारी अडीचच्या सुमारास मुळा-मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली होती.

जीवाची पर्वा न करता खराडी पोलिसांनी दिले इसमाला जीवनदान

रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक घटना घडली. बुधवारी अडीचच्या सुमारास मुळा-मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती खराडी पोलीस ठाण्यास मिळाली होती. ही माहिती मिळताच, सपोनि खांडेकर आणि इतर पोलीस खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या मुळा-मुठा नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरील रस्ता बंद करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी पाहिले की एक इसम मोटरसायकलसह बंधाऱ्यावर मध्यभागी अडकला आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

त्या इसमाला वाचवण्यासाठी फायर ब्रिगेड यांना तात्काळ कळविले गेले. परंतु पाण्याचा प्रवाह वाढत होता. तो इसम पाण्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने सपोनि खांडेकर, पोलीस अंमलदार दोरगे, पोलीस हवालदार सय्यद, पोलीस अंमलदार गायकवाड, महिला पोलीस अंमलदार थोरात, महिला पोलीस अंमलदार मालवंडे, पोलीस अंमलदार साळके, पोलीस अंमलदार काळे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोरीच्या साह्याने मानवी साखळी बनवून सदर इसमास सुरक्षितरीत्या बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. या इसमाचे नाव नवाज खुर्शीद कोतवाल (वय: 38 वर्ष, रा: तुकाराम नगर, चंदन नगर, पुणे) आहे. तसेच सदरचा रस्ता बॅरिकेट लावून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. वेळप्रसंगी जीवाची पर्वा न करता संबंधित इसमाचे प्राण वाचवून त्याला जीवनदान दिल्याबद्दल खराडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सम्बन्धित सामग्री