सातारा : सातारा कराडच्या लेकीचा अमेरिकेत मृत्यूशी संघर्ष पण पालकांना अमेरिकेचा मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नाही. मंत्र्यांचे उंबरठे झिजवले पण दाद मिळेना.
नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसांपूर्वी अपघात झाला असून तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. वडिलांना व्हिसाची प्रतीक्षा असून केंद्र सरकारकडून देखील मदतीची अपेक्षा आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील उंब्रज गावच्या नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत 11 दिवसांपूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लेक मृत्यूशी झुंज देत असताना देखील वडिलांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
मरणाच्या दारात असणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना व्हिजा मिळत नाही. साताऱ्यातील कराड तालुक्यातील असलेल्या उंब्रज वडगाव गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसापूर्वी अपघात झाला असून तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाही.
हेही वाचा : Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती
नीलमची प्रकृती गंभीर
नीलम हीला 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेत व्यायामसाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र रक्ताचे नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगता आहेत. अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हात, पायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तीची प्रकृती गंभीर आहे.
पालकांना कोणी दाद देईना. सध्या निलमची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार डॉ अतुल भोसले यांच्याकडे व्हिसासाठी संपर्क केला. मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा ऑफिसला पालक गेले तरीही दाद मिळेना. आमची व्यथा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी व आम्हाला लवकरात लवकर व्हिसा मिळावा अशी विनंती नीलमच्या मामा, वडिलांनी केली आहे.