शिर्डी : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरावर झालेल्या दरोडा प्रकरणातील सहा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल 26 लाखांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात दरोडा टाकत देवीचे सोन्या चांदीचे दागिने लुटीची घटना घडली होती. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची सुत्रे हलवत दरोड्याचा सूत्रधार सुयोग दवंगे साथीदार सचिन मंडलिक याच्यासह सहा जणांना लोणी कोल्हार रस्त्यावर जेरबंद करत 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा : ट्रक अडकला, ट्रेन धडकली अमरावती एक्स्प्रेसचा भीषण अपघात
महालक्ष्मी मंदिरात 51 तोळ्याचे दागिने चोर घटना घडली होती. या प्रकरणातील संबंधित सहा आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. त्या चोरांकडून तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महालक्ष्मी माता मंदिराचा 8 मार्च रोजी अज्ञात चोरट्याने दरवाजा व गाभार्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप, टोपामधील सोन्याचे पान, मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे एकूण 24 लाख 94 हजार रुपये किमतीचे दागिने चोरुन नेल्याचा संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल आहे.