Sunday, August 31, 2025 09:30:42 AM

शिक्षकाचं रूप की विकृती? भरवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, पालक संतप्त!

रोहा तालुक्यातील एका शिक्षकाने वर्गाच्या चार भिंतींतच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला तडा दिला, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षकाचं रूप की विकृती भरवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन पालक संतप्त

रोहा तालुक्यातील एका शिक्षकाने वर्गाच्या चार भिंतींतच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला तडा दिला, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनिल कुंभार या शिक्षकाने वर्गात शिकवण्याच्या नावाखाली वर्गातील 5-6 विद्यार्थिनींना स्पर्श करत त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती पालकांना मिळताच संतप्त पालकांनी रोहा पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. संबंधित शिक्षकाविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी अनिलला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा: राकेश म्हणाला मुंबईला नाही जायचं; रागाच्या भरात गौरीने भांडी फेकली, चाकू उगारला आणि त्या रात्री घडलेलं भयंकर सत्य

विशेष म्हणजे, हा शिक्षक यापूर्वीही अशा कृत्यात गुंतल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली होती, मात्र त्यावर योग्य ती कारवाई झाली नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण असून, शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 


सम्बन्धित सामग्री