Wednesday, September 03, 2025 04:29:06 PM

रेल नीरच्या अंबरनाथ प्लांटची क्षमता वाढणार

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अंबरनाथमध्ये असलेल्या रेल नीर प्लांटची क्षमता वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल नीरच्या अंबरनाथ प्लांटची क्षमता वाढणार

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम (आयआरसीटीसी) कॉर्पोरेशनच्या अंबरनाथमध्ये असलेल्या रेल नीर प्लांटमध्ये नवी जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्लांटची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या या प्लांटमध्ये दररोज सुमारे १४,००० बॉक्सची निर्मिती होत असून, नव्या जलवाहिनीमुळे ती २०,००० बॉक्सपर्यंत वाढविण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री