Sunday, August 31, 2025 02:55:14 PM

धक्कादायक! रिंगणगावच्या 13 वर्षीय मुलाचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला

जळगावच्या एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथील 12 वर्षीय तेजस महाजन याचा गळा चिरलेला मृतदेह खर्ची गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

धक्कादायक रिंगणगावच्या 13 वर्षीय मुलाचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला

जळगाव: एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवार, दिनांक 17 जून रोजी सकाळी 8 वाजता खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, एरंडोल पोलीस स्टेशनमार्फत तपास सुरू आहे.

मयत बालकाचे नाव तेजस गजानन महाजन (वय 13, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) असे आहे. तो आपल्या आई-वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहात होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती आणि हार्डवेअर दुकानाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करतात.

हेही वाचा: नवी मुंबई वाशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस; शव गुंडाळण्यासाठी दोन हजारांची मागणी

सोमवार, 16 जून रोजी गजानन महाजन यांनी तेजसला दुकानावर बसवून स्वतः काही कामासाठी जळगावला गेले होते. त्यानंतर तेजसने दुकान बंद करून घरी यावे अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, तो घरी परतलाच नाही. सोमवार हा गावाचा बाजाराचा दिवस असल्याने परिसरात गर्दी होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने शोधाशोध सुरू केली. अखेर एरंडोल पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली. मंगळवारी सकाळी सुमारे 8 वाजता खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात एक मृतदेह आढळून आल्याची माहिती काही ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली असता, तो तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

हेही वाचा: राज ठाकरे महायुतीत आले तरी काही उपयोग नाही; रामदास आठवले यांचा टोला

ही घटना समजताच कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरातही मोठा संताप आणि भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली असून, गुन्हे शाखेचाही तपास सुरू झाला आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, काही संशयितांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

ही खळबळजनक हत्या झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाचे आणि चिंता व्यक्त होऊ लागली आहे.


सम्बन्धित सामग्री