पिंपरी चिंचवड : नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेला आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध अशा लोणावळा शहराला पर्यटक पसंती देऊ लागले आहेत. देशभरातील पर्यटक सुंदर पर्यटन स्थळांच्या शोधात असतात. त्यातच लोणावळा हे पर्यटन स्थळ सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याने पर्यटक लोणावळ्याला पसंती देतात.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विविध भागातून पर्यटक हे लोणावळ्याची सफर करण्यास आतुर असतात. लोणावळ्यातील राजमाची पॉइंटवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. काही पर्यटक हे दिल्लीवरून प्रथमच लोणावळा पाहण्यास आले आहेत. तर काही पर्यटक अकोला जिल्ह्यातून देखील आलेले आहेत. लोणावळा हे महाराष्ट्राचे कश्मीर वाटत असल्याचा भास होतो.
हेही वाचा : रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये पर्यटकांची रीघ
लोणावळ्याचे वैशिष्ट्ये
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यापासून 150 किलोमीटरवर आहे. लोणावळा, खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे.
लोणावळ्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर लोणावळा हे नाव लेण आणि अवली या दोन शब्दापासून बनवण्यात आले आहे. लेण म्हणजे लेणी आणि अवली म्हणजे रांग.लोणावळा शहरा जवळ कार्ले लेणी, भाजे लेणी, पाटण लेणी, बेडसे लेणी ह्या लेण्या आहेत. हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.1871 मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधून काढले.