मुंबई: नुकतेच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांचा आणि अनधिकृत मशिदींचा प्रश्न उपस्थित केला आहे. अनधिकृत भोंग्यांवर आणि मशिदींवर टिप्पणी केल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 'ख्वाजा गरीब नवाज फाऊंडेशनने व्हिडिओ पोस्ट करून मला धमकी दिली,' असे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे.
अनधिकृत मशिदीचे काही माफिया सदस्यांबद्दल सोमय्या म्हणाले:
यापूर्वी अशाच एका प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले होते की, 'अनधिकृत मशिदीचे काही माफिया सदस्य ग्रेट इस्टर्न सोसायटीतील रहिवाशांना धमकावत आहेत. शुक्रवारी आम्ही तुमच्या आवारात तुमच्या सोसायटीच्या गेटवर प्रार्थना करू.'
कोण आहे युसूफ उमर अन्सारी?
भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव युसूफ उमर अन्सारी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'हजरत ख्वाजा गरीब नवाज फाऊंडेशनचे सचिव युसूफ उमर अन्सारी आहे,' असे सांगण्यात येत आहे.
'त्याची कॉलर धरून बाहेर काढेल,' सूफ अन्सारी म्हणाले:
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत युसूफ अन्सारी म्हणाले, '8 एप्रिलला मी स्वतः त्यांच्या घरी जाणार आहे. त्याचा पत्ता शोधा आणि मला द्या. तो जिथे राहतो, तिथे आपण स्वतः जाऊन घरासमोर धरणे, मोर्चा, निदर्शने करू. त्याची कॉलर धरून बाहेर काढेल.'
व्हिडिओमध्ये संपर्क करण्यास सांगितले:
युसूफ अन्सारी व्हिडिओमध्ये म्हणाले, 'माझी सर्व मुस्लिमांना विनंती आहे की, जर पोलीस कोणत्याही मशिदीजवळ आले, लाऊडस्पीकर काढा किंवा आवाज कमी करा असे म्हणाले. तर हा माझा फोन नंबर आहे. माझ्याशी थेट संपर्क साधा. कोणीही येणार आणि काहीही बोलणार आणि आपण त्याचं ऐकत बसू? हे भारत देश, हे मुंबई शहर आणि हे महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेत चालणारे आहे. भाजपची हुकूमशाही राजवट अजिबात टिकणार नाही.'

किरीट सोमय्या यांनी एफआयआर दाखल केला होता:
हे प्रकरण मुंबईतील गोवंडीतील शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 72 मशिदींमध्ये अनधिकृत लाऊडस्पीकर लावण्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे हे उल्लंघन आहे,' असे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. किरीटच्या या कृतीमुळे युसूफ अन्सारी संतापले असून त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना धमकी दिली.