मुंबई: सद्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होतांना पाहायला मिळतंय. यातच आता पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना उघडकीस आलीय. मुंबईतील वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घरासमोर महिला आणि त्यांचा लहान मुलगा झोपला होता. मात्र, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दोघांना चिरडले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक केली जात असून चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, जखमी महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या संदर्भात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही वाचा: Neelam Gorhes Statement : वक्तव्य भोवळ; ठाकरे गट आक्रमक
दरम्यान वडाळा येथे राम मंदिर बाळाराम खेडेकर मार्गावर घरासमोर महिला आणि तिचा लहान मुलगा झोपला होता. परंतु एक चाराचाकी भरधाव वेगाने आली. आणि यात लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान यावेळी कार चालक दारूच्या नशेत धुंद असल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलंय. त्याने चारचाकी वाहन महिला आणि चिमुकल्याच्या अंगावरून नेली. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, महिला गंभीर जखमी आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर यासंदर्भात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता या आरोपीला काय शिक्षा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यासंपूर्ण घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.