Monday, September 01, 2025 03:59:26 AM

‘औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे?’हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली - एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळांवर घणाघात

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर औरंगजेबाशी तुलना करत जहरी टीका केली

‘औरंगजेब कुठे देवेंद्र फडणवीस कुठे’हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली - एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळांवर घणाघात

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर औरंगजेबाशी तुलना करत जहरी टीका केली. त्यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करत सपकाळांवर जोरदार पलटवार केला आहे.

डोळे काढले की जीभ छाटली? - शिंदेंचा संतप्त सवाल
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावर प्रतिकारीया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली? काय केलं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केली? औरंगजेब कुठे आणि देवेंद्र फडणवीस कुठे? जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा.'  त्यांनी सपकाळांच्या विधानावर आक्षेप घेत सांगितले की औरंगजेबची कबर हा महाराष्ट्रासाठी एक कलंक आहे, आणि हा कलंक पुसला पाहिजे, ही लोकांची भावना आहे.

हेही वाचा: Nagpur Violence Devendra Fadanvis: फडणवीसांनी सांगितला नागपूर हिंसाचाराचा थरारक घटनाक्रम

नागपूरमधील हिंसाचार ‘पूर्वनियोजित कट’ - शिंदे
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'ही घटना पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. ज्या मोमीनपुरा भागात ही घटना घडली, तिथे नेहमी असणाऱ्या अनेक गाड्या अचानक गायब होत्या. काही समाजकंटकांनी मंदीरातील फोटो जाळले, अग्निशमन दलाच्या गाड्यांवर हल्ले केले आणि पोलिसांवर दगडफेक केली.' समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांवरही टीका केली. 'हा औरंगजेब कोणाचा लागतो? त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचावा. औरंगजेबाच्या समर्थनाचा अर्थ देशद्रोह्यांचे समर्थन आहे,' असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले. नागपूर हे शांतताप्रिय शहर असून अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, “औरंगजेब हा क्रूर शासक होता, तसेच देवेंद्र फडणवीस देखील धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असे ते सांगतात. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे.” त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


सम्बन्धित सामग्री