छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ हा शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ होता. त्यांच्या धोरणांमुळे स्वराज्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद इतिहासात नाही. आजच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि शेतीवरील संकटे पाहता शिवरायांची कृषी धोरणे अत्यंत प्रेरणादायी वाटतात.
शिवरायांचे शेतकऱ्यांसाठी विशेष धोरणे
शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण:
शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांना मोगल आणि इतर आक्रमकांच्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी विशेष आदेश दिले जात. तेव्हा मोगल व इतर सत्ताधीश शेतकऱ्यांवर अन्याय करत असत. महाराजांनी शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळी धोरणे आखली.
कर्जमुक्त आणि व्याजमुक्त शेती:
शिवरायांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदरावर कर्ज दिले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नव्हता.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची काळजी:
शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, शेतकऱ्यांना व त्यांच्या गुराढोरांना कोणतीही हानी होऊ नये. १६७३ रोजी एका पत्रामध्ये त्यांनी सांगितले की, “रात्री झोपताना दिव्यांची वाती विझवून झोपा, अन्यथा उंदीर वात घेऊन कडब्याच्या गंजीला आग लावेल, त्यामुळे गुरांना चारा मिळणार नाही आणि शेतीचे मोठे नुकसान होईल.” ही दूरदृष्टी दाखवते की महाराज शेतकऱ्यांच्या हितासाठी किती सतर्क होते.
शेती आणि शेतकऱ्यांचे पुनर्वसन:
1662 मध्ये महाराजांनी आदेश दिला की, “शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा. कुठल्याही परिस्थितीत त्यांना शत्रूच्या तावडीत जाऊ देऊ नका.”
हेही वाचा: शिवजयंतीच्या निमित्ताने विकी कौशल रायगडावर
शेतकऱ्यांसाठी सुवर्णयुग का?
शिवरायांच्या या धोरणांमुळे स्वराज्यात शेतकरी समाधानी व सुरक्षित होते. त्यांना कुठलेही अन्याय किंवा आर्थिक संकट नव्हते. म्हणूनच इतिहासात स्वराज्यात एकही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद नाही.