महाराष्ट्र्र : महाराष्ट्रात नेहमीच राजकीय रंगत पाहायला मिळते. महाराष्ट्र आणि राजकारण यांचं एक अनोखं समीकरण आहे. अशातच आता सर्वत्र एकच चर्चेला उधाण आलंय. ते म्हणजे शिवसेना भाजपात विलीन होणार का? यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. आधीच शिवसेनेत फूट पडली नंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडले. त्यातच आता पुन्हा शिवसेना भाजपात विलीन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दावा केलाय. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत मोठा दावा केला आहे. येत्या काही दिवसांत शिंदेंची सेना भाजपत विलीन होईल, असा दावा संजय राऊतांनी केलाय आहे. शिंदे सेनेचा एक गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाईल, असंही राऊत म्हणालेत.
हेही वाचा: नाशिक महायुती वाद चव्हाट्यावर
भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे. आता त्यांचं स्वतःचंच काम तमाम होणार आहे. त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे. त्यांचा पक्ष भाजपत विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपत जाईल. हे स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो, असं राऊत ठामपणे म्हणालेत.
दरम्यान आता राऊतांच्या हा दावा कितपत खरा ठरतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडालीय. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे काम झाले आहे. आता त्यांचं स्वतःचंच काम तमाम होणार आहे. त्यांना आणि त्यांच्या लोकांनाही हे माहीत आहे. त्यांचा पक्ष भाजपत विलीन होईल किंवा एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात भाजपत जाईल. हे स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो, असं राऊत ठामपणे म्हणालेत.