Sunday, August 31, 2025 11:27:35 AM

भुमरेंच्या चालकाला मिळालेल्या जमीनीच्या किंमत ऐकून धक्का बसेल; भेट म्हणून मिळालेली जमीन किती कोटींची?

भूमरे यांच्या चालकाची जमीन चक्क 241 कोटींची आहे. कोट्यवधींची जमीन त्याला भेट म्हणून मिळाली होती असे म्हटले जात आहे.

भुमरेंच्या चालकाला मिळालेल्या जमीनीच्या किंमत ऐकून धक्का बसेल भेट म्हणून मिळालेली जमीन किती कोटींची

छत्रपती संभाजीनगर: भूमरे यांच्या चालकाची जमीन चक्क 241 कोटींची आहे. कोट्यवधींची जमीन त्याला भेट म्हणून मिळाली होती असे म्हटले जात आहे. या जमिनीचं शासकीय मूल्याकंन 241 कोटीहून अधिक असून बाजारभावानुसार जमिनीची किंमत 2 हजार कोटींच्या घरात आहे.

हेही वाचा: पंतप्रधान तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार

खासदार संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेखला भेट म्हणून मिळालेली जमीन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या भुमरेंच्या चालकाला आयकर विभागाची नोटीस देखील आली होती, त्यानंतर आता त्या हिबानामा केलेल्या जमिनीची किंमत किती? हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेनं या जमिनीचं शासकीय मूल्य काढण्याबाबत पत्र महसूल विभागाला दिलं. त्यानंतर महसूल विभागाने पहिल्यांदाच जावेद शेखच्या नावावर हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीची अधिकृत किंमत समोर आणली आहे. या जमिनीचं शासकीय मूल्यांकन 241 कोटी 69 लाख 51 हजार 408 रुपये असल्याचं म्हटलं आहे. तर याच जमिनीचा बाजार भावाचा विचार केल्यास अंदाजे 2 हजार कोटींच्या घरात असल्याचं बोललं जात आहे.  


सम्बन्धित सामग्री