मुंबई: गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रविवारी दिवसकालीन ब्लॉक टाळण्यात आल्याने प्रवाशांना सणाच्या दिवशी आरामशीर प्रवास करता येणार आहे. मात्र, शनिवारी मध्यरात्रीपासून पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार असून, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांत लोकल थांबणार नाही.
दुसरीकडे, मध्य आणि हार्बर रेल्वे प्रवाशांना रविवारी मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागेल.
हेही वाचा: मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे लक्ष
कोठे आणि कधी?
मध्य रेल्वे: ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर – सकाळी 11 ते दुपारी 4
हार्बर रेल्वे: कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर – सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
गुढीपाडवा सण असल्याने रेल्वेने दिवसाच्या वेळी पश्चिम मार्गावरील ब्लॉक टाळण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, मध्य आणि हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकमुळे काही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.