Monday, September 01, 2025 03:04:36 AM

महापालिका आयुक्तांनी घेतली पारशी कॉलनीतील नागरिकांची भेट

मुंबईतील दादर येथील पारशी कॉलनीतील नागरिकांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (BMC) डॉ. अभिजित बांगर यांनी भेट घेतली.

महापालिका आयुक्तांनी घेतली पारशी कॉलनीतील नागरिकांची भेट

मुंबई : मुंबईतील दादर येथील पारशी कॉलनीतील नागरिकांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (BMC) डॉ. अभिजित बांगर यांनी भेट घेतली. या बैठकीत कॉलनीत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या सध्याच्या स्थितीबाबत चर्चा केली. तसेच काही महत्त्वपूर्ण सूचना महापालिका आयुक्त बांगर यांनी दिल्या.

दादर येथील पारशी कॉलनीतील नागरिकांशी रस्ते बांधकामाविषयीच्या चर्चेदरम्यान रस्ते बांधकामाच्या वेळी ठरलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. जेणेकरून त्रास कमी होईल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. जमीनीचे खोदकाम चालु असताना वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित व सोयीचा मार्ग उपलब्ध करून देण्याविषयी त्यांनी सांगितले. तसेच स्टॅम्प काँक्रिट ऐवजी बूमिंग तंत्राचा वापर करावा. ते टिकाऊ आणि योग्य ठरेल असे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

बांगर यांच्या चर्चेतील मुख्य मुद्दे -

रस्ते बांधकामाच्या वेळी ठरलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून त्रास कमी होईल.

उत्खननाच्या वेळी वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी सुरक्षित व सोयीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा.

स्टॅम्प कॉंक्रिटच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ब्रूमिंग तंत्राचा वापर करावा, जे अधिक टिकाऊ आणि योग्य ठरेल.


सम्बन्धित सामग्री