Thursday, August 21, 2025 12:39:14 AM

'रॅपिडोसारखी बाइक-टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार' परिवहनमंत्र्यांची घोषणा

येत्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाइक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीये.

 रॅपिडोसारखी बाइक-टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार परिवहनमंत्र्यांची घोषणा

मुंबई: मुंबईचा वाढता प्रवासदर, नोकरी धंद्याला जाताना कोणी टॅक्सी कोणी बस कोणी ट्रेन कोणी खासगी कारचा वापर करत असतं गरजेप्रमाणे प्रवास करण्याचे स्रोत बदलत असल्याचं चित्र पाहायला मिळतं परंतु ह्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढताना दिसते आणि म्हणून ट्रॅफिकच्या त्रासाने  रिक्षा-टॅक्सीचालकांच्या नकारघंटांमुळे हैराण झालेल्या सामान्य नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाइक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीये. राज्यातील वाहतुकीच्या सेवासुविधा वाढवण्याच्या अनुषंगाने परिवहन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बाइक टॅक्सीसाठी परवाने देण्याचे कामही सुरू होणार असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. 

इंग्लंडसमोर भारतीय गोलंदाजांच, तर सामन्यावर जीबीएसचं आव्हान


नेमकी कशी असणार रॅपिडोसारखी बाइक-टॅक्सीसेवा ?
एका किलोमीटरसाठी ३ रुपये भाडे
जीपीएस यंत्रणा आवश्यक
पाठी बसणाऱ्यास हेल्मेट बंधनकारक
संबंधित संस्थेकडे ५० दुचाकी वाहने आवश्यक

अहमदनगर नामांतराचा मुद्दा खंडपीठात; केंद्र आणि राज्य सरकारसह आयुक्तांना नोटिसा

मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशा सूचना एल के झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाइक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार आता मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री