Sunday, August 31, 2025 02:10:46 PM

पनवेल ते सीएसएमटी लोकलचा खोळंबा

पनवेल ते सीएसएमटी लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे.

पनवेल ते सीएसएमटी लोकलचा खोळंबा

मुंबई : पनवेल ते सीएसएमटी लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे. जेसीबीमुळे ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणार वाहतूक खोळंबली आहे. पनवेल स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटली. पनवेल स्टेशनजवळ अनेक प्रवाशी ट्रॅकवरून चालत असल्याचे चित्र आहे. सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न हार्बर रेल्वेकडून होत आहेत.

 

पनवेल ते सीएसएमटी हार्बर मार्गावर बिघाड झाला आहे. हा बिघाड झाल्यामुळे रेल्वे गाड्या 15 ते 20 मिनिट उशीराने धावणार आहेत. पनवेल ते सीएसएमटी रेल्वे मार्गावर हा तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गिकेवरून सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने लोकल धावत आहेत.  


सम्बन्धित सामग्री