Friday, September 19, 2025 01:30:26 PM

येणारा काळ राष्ट्रवादीचाच, अजित पवारांचा दावा

विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

येणारा काळ राष्ट्रवादीचाच अजित पवारांचा दावा

मुंबई : विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत अधिवेशन पार पडलेल्या अधिवेशनात अजित पवारांनी येणारा काळ आपलाच असल्याचा दावा केला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला.

एका जिल्ह्यातील प्रकरणी पक्ष आणि पक्षनेतृत्व बदनाम होत असल्याचा मुद्दा नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला. मलिकांच्या विधानाने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

बीड प्रकरणाचे पडसाद

बीड हत्या प्रकरणाचे राष्ट्रवादीच्या शिर्डी शिबिरात पडसाद उमटले आहेत. नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. एका जिल्ह्यातील प्रकारामुळे पक्ष आणि पक्ष नेतृत्त्वाची बदनामी सुरू आहे. पक्ष नेतृत्त्वानं पक्षाच्या हिताचा विचार करुन यावर निर्णय घ्यावा. आगामी निवडणुकांसाठी अशी बदनामी होणं पक्ष हिताचं नाही.

पक्षाची ताकद राज्याबाहेरही वाढत आहे. देशात काँग्रेस बाद होत चालली आहे, त्यामुळे ती पोकळी भरण्यासाठी आपल्याकडे संधी आहे. पक्षाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी मिळून संकल्प करा. आगामी सर्व निवडणुकींत झोकून काम करण्याचा सल्ला पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

हेही वाचा : स्वामित्व योजनेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सनद वितरणाचा शुभारंभ

बीड प्रकरणामुळे काहीसे दूर असलेले धनंजय मुंडे यांनी रविवारी पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावली. त्यांनी बीड जिल्ह्याला बदनाम केलं जातंय असा आरोप केला. आपल्यावरील आरोप सिद्ध करून दाखवा असा दावाही त्यांनी विरोधकांना यावेळी केला. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवायला हवा असं सूचक विधान यावेळी मुंडे यांनी केलं आहे.

नाराज भुजबळांनी आगामी काळात पक्षात काही बदल करावे लागलीत असे सूचक वक्तव्य केलं आहे. पक्षाच्या संसदीय समितीने योग्य निर्णय घेतल्यास त्याचा फायदा पक्षालाच होईल असेही ते म्हणालेत. भुजबळांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही तास अधिवेशनाला हजेरी लावून पुन्हा एकदा आपली नाराजी दाखवली होती.

आगामी निवडणुकीचे रणशिंग फुकण्याची तयारी अन्य पक्षांप्रमाणे राष्ट्रवादीने केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीनाट्य पक्षाला भविष्यात अडचणीचे ठरू शकतात.


सम्बन्धित सामग्री