Monday, September 01, 2025 05:10:05 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अमरावती विमानतळाचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 एप्रिल रोजी अमरावती (बेलोरा) विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अमरावती विमानतळाचे उद्घाटन

अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 एप्रिल रोजी अमरावती (बेलोरा) विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. ज्यामुळे, अमरावतीचे रहिवासी आठवड्यातून तीन दिवस सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी विमान प्रवास करू शकतील. 'अलायन्स एअरलाईनच्या वेबसाइटवर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे', अशी माहिती महाराष्ट्र एअर डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालिका स्वाती पांडे आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

अमरावती विमानतळ ठरणार गेम चेंजर:

जिल्हाधिकारी सौरभ यांनी म्हटले की, 'विदर्भाच्या अर्थव्यवस्थेसाठी, व्यापारासाठी, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी अमरावती विमानतळ गेम चेंजर ठरणार आहे. त्यासोबतच, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उडान योजनेअंतर्गत विकसित केलेले अमरावती विमानतळ केवळ पायाभूत सुविधाच नाही तर उद्योग, व्यवसाय आणि प्रवासासाठी देखील एक सुवर्ण प्रवेशद्वार असेल'. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत असलेले अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ आहे.

प्रादेशिक संपर्क योजना उडानअंतर्गत अमरावती विमानतळावरून व्यावसायिक उड्डाण सेवा सुरू होत आहेत. त्यानुसार, अलायन्स एअरलाइन्सने एक वेळापत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये अमरावतीचे रहिवासी आठवड्यातून तीन दिवस मुंबईला विमानवारी करू शकतील. अमरावती विमानतळावरील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन सिस्टीम आणि ग्राउंड हँडलिंगची चाचणी संघाद्वारे झाली असून, अलायन्स एअरलाईनसोबत झालेल्या करारानुसार,

या पथकाने अमरावती विमानतळावरील अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन सिस्टीम आणि ग्राउंड हँडलिंगची चाचणी घेतली आहे. अलायन्स एअरलाईनसोबतच्या करारानुसार, मुंबई-अमरावती-मुंबई विमान सेवा सुरू होईल. मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा असणार आहे. तर आगामी काळात, पुणे आणि नवी दिल्लीसाठी विमान सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची घोषणा देखील करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री