Sunday, August 31, 2025 08:34:46 AM

BJP On Supriya Sule: 'नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा', सुळेंच्या मांसाहाराच्या वक्तव्यावर भाजपाची जोरदार टीका

भाजपा नेते राम कुलकर्णी यांनी नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा असल्याची टीका केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

bjp on supriya sule नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा सुळेंच्या मांसाहाराच्या वक्तव्यावर भाजपाची जोरदार टीका
BJP ON Sule

मुंबई: माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम..? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावर भाजपा नेते राम कुलकर्णी यांनी नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा असल्याची टीका केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सुळेंनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. 

माझं मटण खाणं पांडुरंगाला आवडतं म्हणजे बिज बोए बभुल का तो आम कहाँसे आये राजकारण करताना नास्तिक चेहरा दाखवणे हा खासदार सुप्रिया ताईला पित्याचा वारसा असल्याचा हल्लाबोल राम कुलकर्णी यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले, ते ताईंनी वाचन करावे. 
    ॥मांस खाता हौस करी ॥
     ॥जोडूनी वैरी ठेवियला ॥
      ॥ हाडे कुठूनी पिठ करतात      
        ॥ कर्माची फळे भोगती ॥
मांसाहार करणे म्हणजे शत्रु मोठ्या प्रमाणावर जोडण्यासारखे आहे असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांची राजकीय अधोगती म्हणजे कर्माचे फळ म्हणावे लागेल. जाहीरपणे असं वक्तव्य करुन सुप्रियाताईने वारकरी संप्रदायासोबतच पांडुरंगाचा अपमान केलाय. त्यांनी पंढरपूरला जाऊन नामदेव पायरीजवळ पांडुरंगाची जाहीर माफी मागावी अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली. 

हेही वाचा: Ajit Pawar : अजित पवारांच्या भाषणाला सुरूवात झाली अन् व्यापसपीठावर...

वारकरी संप्रदायाकडून सुळेंच्या वक्तव्याचा निषेध 
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं असं सुळे यांनी म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायातूनही प्रतिक्रया समोर येत आहेत. ह.भ.प. बाळासाहेब महाराज खरात यांनी पांडुरंगाला मांसाहार चालतो असं कुठलाही शहाणा माणूस कधीच म्हणणार नाही. हा पांडुरंगाचा अपमान आहे. हा माळकऱ्यांचा अपमान आहे असं म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.  

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? 
नाशिकमधील दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थिती होत्या. कार्यक्रमातील भाषणादरम्यान सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केला. माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय अडचण असा प्रश्न त्यांनी केला. तसेच आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मात्र सुळेंनी केलेल्या वक्तव्यांवर महायुतीकडून त्यांचा जोरदार समाचार घेतला जात आहे. 

सुळेंच्या वक्तव्याचं छगन भुजबळांकडून समर्थन
दरम्यान सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचं छगन भुजबळ यांनी समर्थन केलं आहे. माझं स्वतःचं हे मत आहे की सरकारने हे ठरवण्याची आवश्यकता नाही. काय खावं?, काय प्यावं? हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, हा त्यांच्यावर सोडून दिला पाहिजे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  

 


सम्बन्धित सामग्री