मुंबई : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. कल्याणचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे. गवळी आणि त्याच्या पत्नीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नराधम गवळीला फाशी होईल, हे सुनिश्चित करा असे कठोर आणि स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
कल्याणप्रकरणी मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर आहेत. आरोपी विशाल गवळीला फाशीची शिक्षा होईल असे कठोर निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. कल्याणचा खटला जलदगती न्यायालयात चालवा असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : कल्याणप्रकरणी नराधम विशालसह पत्नीला 7 दिवसांची पोलीस कोठडी
कल्याण प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. गवळीला बुलढाण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. तर मुलीला रिक्षातून घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाला देखील याआधीच अटक करण्यात आली आहे. राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
कल्याणमध्ये झालेल्या घटनेवर विरोधकांची प्रतिक्रिया समोर येत आहे. कल्याणच्या घटनेवर फडणवीस, श्रीकांत शिंदे गप्प का? असा सवाल ठाकरे सेनेच्या संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना केला आहे. बदलापूर, कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.