Thursday, September 11, 2025 07:19:57 PM

Eknath Khadse : मराठ्यांमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर...; खडसेंचं मोठं वक्तव्य

मराठा आरक्षणाबाबत माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाष्य केले. खडसे म्हणाले की, 'वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही'.

eknath khadse  मराठ्यांमुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर खडसेंचं मोठं वक्तव्य

जुगल पाटील, प्रतिनिधी, जळगाव: मराठा आरक्षणाबाबत माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाष्य केले. खडसे म्हणाले की, 'वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. जर या ठिकाणी हैदराबाद आणि सातारा गॅजेंटच्या माध्यमातून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार असेल तर, ओबीसीही त्या संदर्भामध्ये आपल्या मागण्यासांठी मोर्चे वगैरे काढण्याच्या भूमिकेत दिसत आहेत'.

यानंतर, एका पत्रकाराने माजी मंत्री एकनाथ खडसेंना प्रश्न विचारले की, 'मनोज जरांगे म्हणत आहेत की भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा आहे, त्याला जेलमध्ये घालायला पाहिजे'. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, 'यावर आपण काय बोलणार?'. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जळगाव जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खरंतर आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुम्हाला काय वाटतं आज रणनिती आखली जाणार का? यावर, खडसे म्हणाले की, 'राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आज जळगाव याठिकाणी आलेले आहेत. प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी ते घेणार आहेत. त्या संदर्भात चर्चा करणार आहे. या चर्चेत संघटन अधिक मजबूत करणं, संघटनात्मक दृष्टीने विचार करणं आणि आगामी कालखंडातील निवडणूकांच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे? आणि पक्षाची काय भूमिका राहील, यासंदर्भात ते मार्गदर्शन करणार आहेत. 

यादरम्यान, एका पत्रकाराने माजी मंत्री एकनाथ खडसेंना प्रश्न विचारले की, 'गणेश नाईक यांनी म्हटले की ठाण्याच्या रावणाचा अहंकार अंत करायला पाहिजे आणि दहन करायला पाहिजे. यावर एकनाथ खडसे म्हणाले की, 'असं सरकारमध्ये जे एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या छातीवर त्यांचेच मंत्री बसत आहेत आणि गणेश नाईकांची भूमिका ही भाजपच्या दृष्टीने पाहिली तर योग्य जरी असली तरीही जे आहे ते महायुतीमध्ये आहे आणि ठाण्याचा रावण म्हणजे एका अर्थाने एकनाथ शिंदेंवर जर त्यांनी वक्तव्य केलं असेल, तर आपसामधल्या भानगडीमधून अशाप्रकारचे वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की सरकारमध्ये फार काही शांतता नाहीए'. 


सम्बन्धित सामग्री