Thursday, August 21, 2025 02:30:37 AM

'विरोधकांनी किती महापुरुषांचे पुतळे उभारले ?'

मालवणमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

विरोधकांनी किती महापुरुषांचे पुतळे उभारले


सिंधुदुर्ग : मालवणमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. राणे म्हणाले की ही घटना खरोखरच दुःखद आहे आणि ज्यांनी हा पुतळा बांधला त्यांच्यावर कारवाई व्हावी.  मालवण घटनेवर विरोधकांकडून होणारी टीका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राणे यांनी विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की विरोधक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दुर्दैवी घटनेचे भांडवल करत आहेत. त्यांनी टीका करताना त्यांच्या स्वतःच्या योगदानाचा विचार करावा. किती महापुरुषांचे पुतळे त्यांनी उभारले आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांनी या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला योग्य माहिती देण्याऐवजी केवळ राजकीय फायद्यासाठी टीका करत आहेत. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून दोषींवर योग्य कारवाई होईल असे त्यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री