बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी सर्वपक्षीय मोर्चे काढून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी देखील करण्यात आली. त्यातच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक पोस्ट केली आहे.
काय आहे पोस्ट?
"संतोष देशमुख प्रकरणात शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये एक प्रमुख आयपीएस बाहेरील नेमला आहे. त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिकचे पोलीस आहेत. यातील एक पीएसआय महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा फोटो आहे. किती जवळचे अन् प्रेमाचे संबध आहेत पहा, हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील? याच विघ्ने याने निवडणूक काळात धंनंजय मुंडेचा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केलेले आहे. दुसरा मनोजकुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले १० वर्षे तो बीड एलसीबीमध्येच आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय."
दरम्यान शासनाने नेमलेल्या एसआयटीमध्ये प्रमुख आयपीएस अधिकारी बाहेरील आहेत, मात्र त्यांच्याखाली तपासासाठी नेमलेले पीएसआय महेश विघ्ने हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.