Sunday, August 31, 2025 08:12:22 PM

जयंत पाटलांचा राजीनामा; कोण होणार नवे प्रदेशाध्यक्ष?

महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे.

जयंत पाटलांचा राजीनामा कोण होणार नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी राजीनामा दिला आहे. तसेच, जयंत पाटील मंगळवारी शरद पवारांकडे राजीनामा सुपूर्द करणार आहेत. मात्र अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, 'शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार?'. माहितीनुसार, शशिकांत शिंदेंची शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

काय म्हणाले शशिकांत शिंदे?

'प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित झालेलं नाही. पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. तेव्हा जे निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करू', असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

पुढे शशिकांत शिंदे म्हणाले की, 'चर्चेत आणखी कोणाची नावे आहेत हे मला माहित नाही. मी तुमच्याकडून ऐकले आहे. संघटनेच्या माध्यमातून पवार साहेबांनी महाराष्ट्रात इतिहास रचला आहे, त्यांनी पक्ष संघटना बांधली आहे. पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या दृष्टीने आजचा काळ संघर्षाचा आहे. पवार साहेबांनी निश्चितच त्या वेळी जनतेला अपेक्षित असलेले नेतृत्व दिले आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या अध्यक्षांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्याची तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही. पक्षाने अद्याप प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेतलेला नाही, फक्त पक्षाची बैठक आहे, असा संदेश मिळाला आहे. त्यामुळे, निर्णय काहीही असो. पक्ष उभारणीच्या लढाईत आम्ही एकजुटीने आणि एकजुटीने उभे राहू आणि साहेबांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू', असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: शनिशिंगणापूर देवस्थानावर भ्रष्टाचाराचा कोप ; CM देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत आणि माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. त्यांचे बालपण त्यांचे वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौशल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात गेले. ते लहान वयातच सामाजिक कार्य आणि राजकारणात सक्रिय झाले. शशिकांत शिंदे यांनी पहिल्यांदा 1999 मध्ये जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील कृष्णा खोरे सिंचन महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2009 ते 2014 पर्यंत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून काम पाहिले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला.

शशिकांत शिंदे हे जावळी विधानसभा मतदारसंघातून 2 ते 5 वर्षांसाठी आणि त्यानंतर कोरेगाव येथूनही 2 ते 5 वर्षांसाठी आमदार होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर, शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) भाजपच्या महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. सध्या शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि शरद पवार गटाचे प्रमुख नेते आहेत. आता त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड होणार आहे.


सम्बन्धित सामग्री