पुणे: राज्यातील राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अशातच, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मतचोरीच्या वादावर भाष्य केले. पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपली मतं चोरली जात आहे. बैठकीदरम्यान, राज ठाकरे म्हणाले की, 'मतचोरीच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे'. 'चौकशी झाली तर गेल्या दहा ते बारा वर्षांचा खेळ उघड होईल' असंही राज राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: Asia Cup 2025 : ड्रीम11ची माघार! BCCI समोर नवी डोकेदुखी, कोण असणार आता भारतीय संघाचा नवा स्पॉन्सर?
राज म्हणाले राज ठाकरे?
'आपली मतं चोरली जात आहे. तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी मतं दिली नाही, हे खोटं आहे. आपल्या लोकांनी मतदान केलंय. परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, हे मी त्यादिवशी शिवतीर्थावरील भाषणातही बोललो होतो', असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.