नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत असतात. अशातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली आहे. नेमकं कोणत्या कारणात्सव ही भेट झाली असावी? हा खासदार नेमका आहे तरी कोण? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.
शरद पवार गटाच्या 'या' खासदाराने घेतली मोदींची भेट
शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. अमर काळेंनी ट्विट करत या भेटीबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदारसंघ विकसित करण्याच्या आणि रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ग्रामोद्योगाच्या विचारांवर आधारित देशातील एकमेव संस्था असलेल्या महात्मा गांधी ग्रामीण औघोगिकिकरण संस्थाच्या (MGIRI) सर्वांगीण विकासाकरिता आणि संस्थेच्या विस्तारीकरणाकरिता लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली'.
अमर काळे यांचे पूर्ण नाव अमर शरदराव काळे आहे. ते 18 व्या लोकसभेचे सदस्य आहे. अमर काळे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यासह, ते शरद पवार गटाचे खासदार आहेत.