राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुती बुधवारी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.'जय महाराष्ट्र'च्या खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीचे नेते उद्या दुपारी साडेतीन वाजता राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचे पत्र सादर करतील.
सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या गटात हालचालींना जोर आला आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक तसेच विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भाजपाचे गटनेते निवडले जातील, त्यानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली अधिकृतरीत्या सुरू होतील.महायुतीच्या नेतृत्वाने निवडणुकीतील यशानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. जय महाराष्ट्रला मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीचे नेते राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्याचा दावा करतील. महायुतीकडे बहुमत असल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.भाजपसोबतच महायुतीच्या घटक
पक्षांचे नेतेही बैठकीत उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरकार स्थापनेसाठीच्या रणनीतीवर चर्चा होईल.महायुतीच्या सत्तास्थापनेसाठी होणाऱ्या या हालचालींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत. राज्याच्या विकासासाठी सक्षम आणि स्थिर सरकार देण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.