Sunday, September 21, 2025 02:32:37 PM

Nitin Gadkari: 'आरक्षण न मिळणं हेच वरदान' आरक्षण मुद्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

राज्यात आरक्षणाच्या मागण्या वाढत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या भूमिकेतून आपले विचार मांडले.

nitin gadkari आरक्षण न मिळणं हेच वरदान आरक्षण मुद्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

Nitin Gadkari: राज्यात आरक्षणाच्या मागण्या वाढत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या भूमिकेतून आपले विचार मांडले. नागपूर येथे हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “मी ब्राह्मण समाजातील आहे, आमच्या समाजाला आरक्षण मिळाले नाही आणि हेच परमेश्वराचे मोठे वरदान आहे.”

गडकरी यांनी पुढे स्पष्ट केले की, माणसाचे यश जात, धर्म किंवा पंथावर नाही तर त्याच्या मेहनती, कर्तृत्व आणि गुणांवर अवलंबून असते. उत्तर भारतातील काही राज्यांत ब्राह्मण समाजाचा प्रभाव दिसतो, मात्र महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्राबल्य जास्त आहे. तरीही ते स्वतः जातपात मानत नाहीत आणि प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वावर भर द्यावा, असा त्यांनी संदेश दिला.

तरुण पिढीबाबत बोलताना गडकरींनी शिक्षण व कौशल्यावर भर देण्याचे आवाहन केले. “तरुणांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योग आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित केले तर समाजाची आर्थिक स्थिती आपोआप सुधारेल,” असे ते म्हणाले.

हेही वाचा : PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा आत्मनिर्भरतेवर भर; "देशाचा खरा शत्रू म्हणजे परावलंबन"

याआधीही गडकरी यांनी प्रशासकीय कामकाजातील दबाव, राजकारण्यांची कंत्राटांसाठीची धडपड आणि पारदर्शक कामकाज यावर ठाम भूमिका मांडली होती. “काम चांगले असेल तर त्याचे श्रेय आपोआप मिळते. त्यामुळे दबावाखाली न जाता दर्जेदार आणि पारदर्शक काम करणे महत्वाचे आहे,” असा त्यांचा पुनरुच्चार होता.

गडकरींच्या या विधानामुळे आरक्षणाच्या राजकारणाबरोबरच कर्तृत्व व गुणवत्तेच्या आधारे प्रगती करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


सम्बन्धित सामग्री