मुंबई : संभाजीराजे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचले आहेत. परंतु संभाजीराजेंचा ताफा पोलिसांनी अडवला आहे. त्यानंतर स्वराज्यच्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडा.आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय. पोलीस दडपशाही करत आहेत असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. आम्ही सर्व अरबी समुद्रात जाणारच या भूमिकेवर संभाजीराजे ठाम आहेत. त्याचबरोबर कायदा हातात घेऊ नका असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
सरदार पटेलांचा पुतळा झाला, शिवरायांचा का नाही ? भाजपाचं सरकार असूनही शिवस्मारकाला दिरंगाई का ? असा सवाल यावेळी त्यांनी सरकारला केला आहे.