Sunday, August 31, 2025 09:22:06 PM

Shravan 2025: श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? जाणून घ्या तारीख, योग्य पूजा विधी आणि महत्वाची माहिती

महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलैपासून होणार असून पहिला श्रावणी सोमवार 28 जुलैला आहे. भगवान शंकराची पूजा, उपवास आणि विविध सणांचा महिना म्हणून श्रावणाला विशेष महत्त्व आहे.

shravan 2025 श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय जाणून घ्या तारीख योग्य पूजा विधी आणि महत्वाची माहिती

Shravan 2025: भगवान शंकराचा अतिप्रिय आणि अत्यंत पवित्र मानला जाणारा श्रावण महिना यंदा महाराष्ट्रात 25 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि या महिन्यात विविध सण-उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरे केले जातात.

उत्तर भारतात यंदा श्रावण महिन्याला 11 जुलैपासून सुरुवात झाली असून, महाराष्ट्रात मात्र हा महिना 25 जुलैपासून सुरू होईल. श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून, 23 ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल.

श्रावण महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. यामुळेच श्रावणी सोमवारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्यात एकूण 5 श्रावणी सोमवार येणार आहेत. पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै रोजी येणार आहे.

हेही वाचा: Mangal Budh Yuti 2025: 18 वर्षांनंतर होणार मंगल-बुध युती; 'या' 5 राशींवर संकटांची मालिका, जाणून घ्या

यंदाचे श्रावणी सोमवार -

पहिला : 28 जुलै 2025 

दुसरा : 4 ऑगस्ट 2025 

तिसरा : 11 ऑगस्ट 2025 

चौथा : 18 ऑगस्ट 2025 

हेही वाचा: SHRAVAN 2025: श्रावणात ‘ही’ फुले चुकूनही महादेवाला अर्पण करू नका, अन्यथा होईल प्रकोप

योग्य पूजेची पद्धत (दैनंदिन पूजा विधी):

ही सोपी व योग्य पूजेची सामान्य पद्धत आहे, जी घरगुती रोजच्या पूजेसाठी वापरली जाऊ शकते.

1. स्थळ स्वच्छता: पूजेच्या ठिकाणी आणि देवघर स्वच्छ करावे.आपले स्वतःचे हात-पाय धुणे व तोंड स्वच्छ धुणे.

2. आसन व बसण्याची तयारी: स्वच्छ आसनावर बसावे.शक्य असल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे.

3. दीप प्रज्वलन: समई किंवा दिवा लावावा. तूप किंवा तेलाचा दिवा वापरू शकता.

4. पाणी अर्पण व आचमन: देवतेसमोर पाणी अर्पण करून स्वतः आचमन करावे (शुद्ध होण्यासाठी).

5. संकल्प: मनात संकल्प करावा की, ही पूजा श्रद्धा व भक्तीने करीत आहोत.

6. गणेश पूजन: प्रथम गणपतीला नमस्कार करावा व ओम गं गणपतये नमः म्हणावे.

7. देवी-देवतांची पूजा: देवतेसमोर फुलं, हार, अक्षता, गंध अर्पण करावे. ओम मंत्र किंवा आपल्या कुलदैवताचा मंत्र म्हणत पूजन करावे. शिव पूजेसाठी: ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. बिल्वपत्र, जल, दूध, फुलं अर्पण करावीत.

8. धूप व दीप: धूप दाखवावा व दीप आरती म्हणावी.

9. नैवेद्य अर्पण: फळ, गोड पदार्थ किंवा पाणी नैवेद्य म्हणून अर्पण करावे.

10. मंत्रजप किंवा स्तोत्रपठण: आपल्या श्रद्धेनुसार मंत्रजप, अथवा लघुस्तोत्र वाचावे.

11. प्रार्थना व क्षमायाचना: आपण केलेल्या पूजेचे फळ मिळो अशी प्रार्थना करावी. पूजेमध्ये काही त्रुटी झाल्यास क्षमा मागावी.

12. आरती: शेवटी आरती म्हणावी व उपस्थितांना प्रसाद द्यावा.

श्रावण महिना आला, की सणांची रांगच लागते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा आणि मंगळागौर यांसारखे सण या महिन्यात उत्साहात साजरे केले जातात.

श्रावण महिन्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, हा महिना केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही, तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. मंगळागौर उत्सव महिलांसाठी खास आनंदाचा क्षण असतो, तर नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा हे पर्यावरणाची जपणूक करणारे सण मानले जातात. भगवान शंकरावर विशेष श्रद्धा असलेल्या भक्तांसाठी श्रावण महिना म्हणजे उपवास, व्रत आणि भक्तीचा काळ आहे. या महिन्यात शंकराच्या भक्तीने मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा श्रद्धेचा विश्वास आहे. श्रावण महिना येताच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते आणि वातावरण भक्तिमय बनते. त्यामुळे श्रावण महिना हा केवळ सणांचा नव्हे, तर श्रद्धा आणि संस्कृतीचा महिना ठरतो.
 


सम्बन्धित सामग्री