Friday, September 12, 2025 09:26:33 PM

India VS Pakistan Match : आयपीएलमधील या टीमचा भारत विरुद्ध पाकिस्तान Asia Cup सामन्यावर बहिष्कार, या कृतीनं वेधलं लक्ष

पंजाब किंग्जने सोशल मीडियावरील त्यांच्या सामन्याच्या घोषणेत पाकिस्तानचा उल्लेख न करून एक अनोखी भूमिका घेतली आहे.

india vs pakistan match  आयपीएलमधील या टीमचा भारत विरुद्ध पाकिस्तान asia cup सामन्यावर बहिष्कार या कृतीनं वेधलं लक्ष

Asia Cup 2025: 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या आशिया कप 2025 च्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आता मोठा वाद निर्माण झाला आहे. दहशतवादाच्या चिंतेमुळे काही जण भारत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास विरोध करत असताना, आयपीएल संघ पंजाब किंग्जने सोशल मीडियावरील त्यांच्या सामन्याच्या घोषणेत पाकिस्तानचा उल्लेख न करून एक अनोखी भूमिका घेतली. तथापी, यापूर्वी सामना रद्द करण्याबाबत तातडीने सुनावणीची मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. 

पंजाब किंग्जने सोशल मीडियावर सामन्याच्या घोषणेत पाकिस्तानचा उल्लेख केला नाही. या निर्णयामुळे फ्रँचायझीला त्यांच्या एक्स सोशल मीडिया चॅनेलवरील टिप्पण्या बंद कराव्या लागल्या. पंजाब किंग्जच्या या भुमिकेमुळे दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये विविध चर्चांणा उधाण आलं आहे. 

हेही वाचा Indian Players Take Bronco Test : आशिया कपमध्ये खेळाडूंना का दिली जाते Bronco Test ?; भारताच्या फिजिओने सांगितले कारण

सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी असा युक्तिवाद केला की फलंगम आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळल्यास चुकीचा संदेश जातो. याचिकेत म्हटले होते, राष्ट्रांमधील क्रिकेट सौहार्द दाखवण्यासाठी असते. परंतु आमच्या सैनिकांच्या प्राणांचा बळी घेतल्यावर पाकिस्तानसोबत सामना खेळल्याने उलट संदेश जातो. 

हेही वाचा - Hong Kong Open 2025: सात्विक-चिराग हाँगकाँग ओपन उपांत्य फेरीत; क्वार्टर फायनलमध्ये केला मलेशियन जोडीचा पराभव

याचिकाकर्त्यांनी बळी पडलेल्या कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. तसेच याचिकेत म्हटलं होतं की, राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि नागरिकांच्या सुरक्षेला मनोरंजनापेक्षा प्राधान्य दिले पाहिजे. अशा क्रिकेट सामन्यांचा सशस्त्र दलांच्या आणि राष्ट्राच्या मनोबलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. दरम्यान, सामन्याच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढले आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री