Black Sea Monster Viral Video: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ब्लॅक सी मॉन्स्टरच्या व्हिडिओमुळे जगभरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा एका प्रजातीचा मासा आहे. दिवसा उजेडात कॅमेऱ्यात या प्रजातीच्या माशांचे रेकॉर्डिंग होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जाते.
Humpback Angler Fish Video: समुद्राच्या खोलवर एक वेगळेच जग अस्तित्वात आहे, जिथे असे प्राणी राहतात ज्यांचा आकार आणि रचना मानवांना आश्चर्यचकित करते. या प्राण्यांना पाहिल्यानंतर बरेच लोक म्हणतात की हा निसर्गाचा चमत्कार आहे. अशाच एका माशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवसा उजेडात कॅमेऱ्याने या प्रजातीच्या माशांचे रेकॉर्डिंग करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जाते.
हेही वाचा - 'Google Map'ने दाखवला थेट जलसमाधी घेण्याचा मार्ग; नशीब.. दिवस होता.. रात्र नव्हती.. नाहीतर धरला असता 'वरचा रस्ता'!
खरंतर ही एक मादी ब्लॅक सी-डेव्हिल आहे, ज्याला हंपबॅक अँगलरफिश असेही म्हणतात. तर वैज्ञानिक भाषेत या माशाला मेलानोसेटस जॉन्सोनी असेही म्हणतात. हा मासा 200 ते 2000 मीटर खोलीवर राहतो. त्यामुळे हा मासा पृष्ठभागाजवळ का आला, हे संशोधकांना अद्याप कळलेले नाही. मात्र, दिसल्यानंतर तो त्यानंतर लवकरच तो मरण पावला. त्याला संशोधनासाठी जवळच्या संग्रहालयात नेण्यात आले आहे.
हा मासा कॅमेऱ्यात कसा कैद झाला?
जगात कदाचित पहिल्यांदाच कोणी प्रौढ ब्लॅक सी डेव्हिल किंवा अॅबिसल अँगलरफिश (Melanocetus johnsonii) जिवंत पाहिला असेल, तेही दिवसाच्या उजेडात आणि समुद्राच्या पृष्ठभागावर! हा एक रहस्यमयी मासा आहे. आतापर्यंत, फक्त त्याच्या अळ्या (बाल स्वरूप), मृत प्रौढ किंवा पाणबुड्यांमधून घेतलेले व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते. हा मासा टेनेरिफच्या किनाऱ्यापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर समुद्राच्या खोलीतून थेट पृष्ठभागावर पोहत आला! पेलेजिक शार्क संशोधनादरम्यान @laiavlr ने ते पाहिले आणि नंतर @vidamarina.tenerife, @sabu726 आणि @jara.natura ने दुर्मीळ आणि नेत्रदीपक फोटो काढले.
हा एक भयानक खोल समुद्रातील शिकारी आहे, जो सहसा 200 ते 2000 मीटर खोलीवर आढळतो. तो भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी त्याच्या बायोल्युमिनेसेंट अँटेनाचा (जैवविद्यत चमकदार अँटेना) वापर करतो, अगदी फाइंडिंग निमो (Finding Nemo) चित्रपटाप्रमाणेच! पण हा मासा इतक्या कमी खोलीपर्यंत कसा पोहोचला, याचे कारण अद्याप कळलेले नाही - कदाचित तो आजारी असू शकतो किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे आलेला असू शकतो किंवा एखाद्या शिकारी माशाच्या भीताने पळून जाण्याच्या प्रयत्नात किनाऱ्यावर पोहोचलेला असू शकतो. त्याच्या मेलानोसेटस (Melanocetus) या वैज्ञानिक नावाचा अर्थ आहे 'काळा समुद्रातील राक्षस'. जो त्याच्या भयानक स्वरूपामुळे अगदी योग्य वाटतो. हा मासा जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय महासागरांमध्ये आढळतो आणि तो
पहिल्यांदा मडेइराजवळ दिसला.
या माशाचा दुर्मीळ व्हिडिओ @jara.natura या इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. याला 4 लाख 82 हजारांहून अधिक लाईक्स आणि 1 कोटी 33 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही वाचा - म्याँव म्याँव.. मांजरीनं चपळाईनं केलं विमान हायजॅक; उड्डाण झालं 2 दिवस लेट, हुश्श.. अखेर अशी आली बाहेर..