France Violence: नेपाळनंतर आता फ्रान्सच्या रस्त्यांवरही हिंसाचार भडकला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरले असून संतप्त जमावाने जाळपोळ, तोडफोड आणि गोंधळ सुरू केला आहे. फ्रान्सच्या गृहमंत्र्यांच्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे 200 निदर्शकांना अटक करण्यात आली. बुधवारी पॅरिससह इतर भागात रस्ते अडवले गेले, जाळपोळ करण्यात आली. तसेच पोलिसांनी निदर्शकांवर अश्रुधुराचे गोळे सोडले. निदर्शक राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि त्यांच्या नवीन पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा - Nepali Prisoners: 10 नेपाळी कैद्यांचा भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न फसला; सीमा सुरक्षा दलाने केली अटक
रस्त्यावर गोंधळ
दरम्यान, पॅरिसमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 75 लोकांना ताब्यात घेण्यात आले. तथापि, देशभर 80 हजार पोलिस तैनात करण्यात आले असूनही देशात सर्वत्र हिंसाचार सुरू आहे. तथापी, निदर्शकांनी बॅरिकेड्स हटवले, वाहनांना आग लावली आणि पॅरिसमध्ये कचराकुंड्याही जाळल्या. पश्चिमेकडील रेनेस शहरात एका बसला आग लावण्यात आली. त्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली.
हेही वाचा - Nepal Viral Video: चेहरा अन् छातीवर जखमा असूनही थेट आंदोलनात, नेपाळच्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
पंतप्रधान बदल आणि आंदोलनाचा प्रसार
संसदेत विश्वासदर्शक मत गमावल्यावर पंतप्रधान फ्रँकोइस बायरो यांना पदावरून काढून टाकण्यात आले, आणि सेबॅस्टियन लेकोर्नू यांनी त्यांची जागा घेतली. सोशल मीडियावर आवाहनानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले. बुधवारी ऑनलाइन संप, बहिष्कार आणि रस्ते अडथळे यामुळे देशभर गोंधळ निर्माण झाला आहे. तज्ञांचे मत आहे की, हे निषेध केवळ सरकारच्या धोरणांविरुद्ध नाही तर जनतेमध्ये वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहे.