Saturday, September 20, 2025 07:56:18 PM

H-1B Visa: '24 तासांच्या आत अमेरिकेत परत या...' मायक्रोसॉफ्टचा भारतीय कर्मचाऱ्यांना इशारा

कंपनीने भारतात असलेल्या कर्मचाऱ्यांना 21 सप्टेंबर 2025 पर्यंत अमेरिकेत परत येण्याचे आवाहन केले आहे.

h-1b visa 24 तासांच्या आत अमेरिकेत परत या मायक्रोसॉफ्टचा भारतीय कर्मचाऱ्यांना इशारा

H-1B Visa: अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या भारतीय कर्मचाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्टने तातडीची सूचना जारी केली आहे. कंपनीने भारतात असलेल्या कर्मचाऱ्यांना 21 सप्टेंबर 2025 पर्यंत अमेरिकेत परत येण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा नवीन H-1B शुल्क नियम लागू झाल्यानंतर परत प्रवेशासाठी 100,000 डॉलर शुल्क भरणे आवश्यक होईल.

कंपनीच्या अंतर्गत ईमेलमध्ये स्पष्ट केले आहे की, या नियमाचा फटका सर्व परदेशी कर्मचाऱ्यांवर लागू होईल, परंतु खर्च फक्त आवश्यक किंवा उच्च-स्तरीय भूमिकांमध्ये काम करणाऱ्यांनाच कंपनीने सहन करावा लागेल. या घोषणेचा अर्थ असा की उर्वरित कर्मचाऱ्यांनी नियम लागू होण्यापूर्वी अमेरिकेत परतणे अनिवार्य आहे.

हेही वाचा - e-Passport : डिजिटल भारताचा नवा चेहरा ; जाणून घ्या ई-पासपोर्टची संपूर्ण माहिती

मायक्रोसॉफ्टने H-1B व्हिसा धारकांना त्यांच्या प्रवास योजना रद्द करण्याचा आणि नजीकच्या भविष्यासाठी अमेरिकेत राहण्याचा सल्ला दिला आहे. या सूचनेत H-4 व्हिसा धारकांच्या अवलंबितांचा थेट उल्लेख नसला तरी, कंपनीने त्यांच्या पती-पत्नी आणि मुलांना आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा -Donald Trump On H-1B Policy : एच-1 बी व्हिसा शुल्कात मोठी वाढ; अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना धक्का

ट्रम्प प्रशासनाच्या नवीन नियमांनुसार, 21 सप्टेंबर 2025 पासून H-1B व्हिसा अर्जांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी 100,000 डॉलर (सुमारे 88.10 लाख रुपये) शुल्क भरावे लागेल. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी हा नियम विशेषतः महत्त्वाचा ठरत आहे, कारण सुमारे 70 टक्के H-1B व्हिसा धारक भारतीय आहेत. मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयामुळे भारतीय IT कर्मचाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 


सम्बन्धित सामग्री