Wednesday, September 03, 2025 08:45:31 AM

आता 'हा' देश पुरवणार भारताला कच्चे तेल; कोणत्या देशाने दिला देशाला मदतीचा हात? जाणून घ्या

आता हा देश पुरवणार भारताला कच्चे तेल कोणत्या देशाने दिला देशाला मदतीचा हात जाणून घ्या
crude oil
Edited Image

भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कच्च्या तेलाची आयात वाढवत आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी घोषणा केली की, भारत आता 40 देशांकडून तेल खरेदी करतो. यापूर्वी ही संख्या 27 होती. यामध्ये आता अर्जेंटिना या देशाची भर पडली आहे. म्हणजेच आता अर्जेंटिना देखील भारताला कच्या तेलाचा पुरवठा करणार आहे. भारताच्या ऊर्जा स्रोतांमध्ये परिवर्तन आणणे आणि कच्च्या तेलाचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करणे हे या हालचालीचे उद्दिष्ट आहे. भारताची कच्च्या तेलाची आयात मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप आणि अमेरिका यासारख्या प्रदेशांमधून होते. भारताला तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत सौदी अरेबिया, रशिया, इराक, अमेरिका आणि युएई यांचा समावेश आहे. इतर पुरवठादारात नायजेरिया, ब्राझील, कझाकस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे.

हेही वाचा - काय सांगता!! तिरुपतीचे लाडू विकून मंदिराला दरवर्षी मिळतात 'इतके' कोटी रुपये

भारतातील तेलाची वाढती मागणी - 

एस अँड पी ग्लोबल कमोडिटी इनसाइट्सच्या एका अहवालात भारतातील रिफाइंड कच्च्या तेलाच्या वाढत्या मागणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. पर्यायी इंधनांचा पारंपारिक जीवाश्म इंधनांच्या वापरावर हळूहळू परिणाम होत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. तथापि, जवळच्या भविष्यात भारताच्या ऊर्जा क्षेत्रात जीवाश्म इंधने महत्त्वाची भूमिका बजावत राहतील असंही सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा -  'ही' सरकारी योजना देते FD पेक्षा जास्त परतावा; 31 मार्चपर्यंतचं करू शकता गुंतवणूक

भारतात तेल निर्यात करणारे देश - 

या यादीत सौदी अरेबिया, रशिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), इराक, ओमान असे 40 देश भारताला कच्चे तेल निर्यात करतात. पूर्वी या यादीत 27 देश होते. तथापि, आता ही संख्या 40 पर्यंत वाढली आहे. एस अँड पी ग्लोबलचा अंदाज आहे की, भारताची रिफाइंड कच्च्या तेलाची मागणी दररोज 5.7 दशलक्ष बॅरलपर्यंत पोहोचू शकते. ही वाढ जागतिक ऊर्जा क्षेत्रात भारताचे वाढते महत्त्व दर्शवते. 

अर्जेंटिनाचा पुरवणार भारताला कच्चे तेल - 

दरम्यान, पुरवठादार म्हणून अर्जेंटिनाने भारताला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे आता भारताला आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी विशिष्ट ठिकाणांवर किंवा देशांवर जास्त अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. अलीकडेच, अर्जेंटिनाचाही पुरवठादारांच्या यादीत समावेश करण्यात आल्याने भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होण्यास मदत होणार असल्याचं हरदीप पुरी यांनी सांगितलं आहे. 
 


सम्बन्धित सामग्री