Wednesday, August 20, 2025 09:15:38 PM

Video Viral: पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली! मूठ आपटून म्हणाले, 'भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही!'

आर्थिक विकास, सामाजिक विकास आदी निकषांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे असला, तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र एक दिवस पाकिस्तान भारताला मागे टाकेल, असा भरवसा सामान्य जनतेला देत आहेत.

video viral पाकिस्तानी पंतप्रधानांची अजब देहबोली मूठ आपटून म्हणाले भारताला हरवलं नाही तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही

Pakistan PM Shehbaz Sharif Viral Video: पाकिस्तानात सत्तेत राहण्यासाठी सर्व राज्यकर्ते आणि नेते 'भारताशी स्पर्धा आणि भारतद्वेष' हाच फंडा वापरतात. सर्वच बाबतीत जगात आपण कुठेही, कुठल्याही क्रमांकावर असू; मात्र, भारताच्या तुलनेत आपण कुठे आहोत, हे एकच मोजमाप वापरताना हे लोक दिसतात. जगभरात एका बाबतीत मात्र, पाकिस्तान सर्वांच्या चढाओढीत पुढे असलेला दिसतो. ती बाब म्हणजे इथले नेतेही जगभरातील इतर नेत्यांप्रमाणे आश्वासनं देण्यात मागे पडलेले नाहीत.

तसं पाहिलं तर, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत भारतानं विविध क्षेत्रांमध्ये जी प्रगती साधली आहे, ती इतर गोष्टींपेक्षा देशहिताला दिलेलं महत्त्व आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याचा दृष्टिकोन यामुळेच..! पाकिस्तानी राज्यकर्त्यांजवळ हा दृष्टिकोन नसल्यामुळे आणि भारतावर नसत्या कुरघोड्या करण्यात पाऊण शतक घालवल्यामुळे पाकिस्तानने तिथे सुरुवातीला असलेल्याही अनेक गोष्टी गमावल्यात. तरीही तिथल्या राज्यकर्त्यांची नसते उपद्व्याप करण्याची खुमखुमी अजूनही गेलेली नाही. यात आता पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

हेही वाचा - 'ते आमच्यावर चिखलफेक करतात...' इटलीच्या पंतप्रधानांचा डाव्या पक्षांवर ढोंगीपणाचा आरोप; म्हणाल्या,'मी, मोदी आणि ट्रम्प..'

आर्थिक विकास, सामाजिक विकास किंवा इतर कोणत्याही निकषांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे असला, तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र एक दिवस पाकिस्तान भारताला मागे टाकेल, असा भरवसा सामान्य जनतेला देताना दिसत आहेत. एवढंच नव्हे; तर, 'जर असं झालं नाही, तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही,' अशी घोषणाच शाहबाज शरीफ यांनी करून टाकली आहे! पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायासमोर उत्साहित झालेल्या शरीफ यांनी अनेक वेगवेगळे हावभाव आणि अंगविक्षेप करत हे विधान केले आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात पाकिस्तानी पंतप्रधान मूठ आपटून 'पाकिस्तान भारताला मागे टाकेल,' असे आश्वासन जनतेला देताना दिसत आहेत.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात डेरा गाझी खान भेटीसाठी शाहबाज शरीफ सोमवारी दाखल झाले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा विकास, जागतिक पटलावर पाकिस्तानची यशस्वी घोडदौड आणि पाकिस्तानला चांगले दिवस आणून दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, पाकिस्तानमधील नागरिकांनी यात दिवस-रात्र मेहनत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी उपस्थित जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शाहबाज शरीफ यांनी आपल्या हाताची मूठ पोडियमवर आपटत भारताला हरवण्याची शपथ घेतली!

वेड्या जनतेचा वेडा विश्वास ?
या कार्यक्रमात उपस्थित पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना शाहबाज शरीफ म्हणाले, “पाकिस्तानची प्रगती साध्य करण्यासाठी आपण सगळे दिवस-रात्र काम करू. परमेश्वरानं कायम पाकिस्तानवर कृपादृष्टी ठेवली आहे. मी नवाज शरीफ यांचा चाहता आहे, त्यांचा अनुयायी आहे. आज मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की, आपण सगळे मिळून मेहनत करू आणि पाकिस्तानला महान बनवू”, असं शाहबाज शरीफ म्हणाले.

पाकिस्तानच्या विकासाचे दावे करताना शरीफ यांनी भारताला हरवण्याबाबतचा उल्लेख केला. “जर पाकिस्तानला पुन्हा महान बनवून आपण हिंदुस्थानला पराभूत केलं नाही, तर माझं नाव शाहबाज शरीफ लावणार नाही”, असा निर्धारच शरीफ यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष म्हणजे, समोर बसलेल्या पाकिस्तानी जनतेकडून शरीफ यांच्या अशा वक्तव्याने झेंडे हलवून दाद मिळाली.

सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!
शाहबाज शरीफ यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे पाकिस्तान जागतिक स्तरावर आर्थिक विकासाच्या बाबतीत किंवा सामाजिक सुरक्षितता वा राहणीमानाच्या बाबतीत यादीमध्ये खालच्या क्रमांकावर असताना दुसरीकडे शरीफ यांच्याकडून नुसतीच खोटी आश्वासनं दिली जातात, अशी टीका पाकिस्तानमधील नेटिझन्स करताना दिसत आहेत.
हे विधान करण्याच्या काही दिवस आधीच शाहबाज शरीफ यांनी भारताशी बंद झालेला पाकिस्तानचा संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पाकिस्तान जोपर्यंत आपल्या भूमीवरील दहशतवाद संपवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही, अशी भूमिका भारतानं स्पष्ट केली आहे.

हेही वाचा - कशी वाटते स्कीम? डास पकडून आणा अन् पैसे मिळवा; जिवंत आणि मेलेले डास घेऊन लोकांच्या रांगा..


सम्बन्धित सामग्री